राजस्थानातही भाजपचा धक्का ब्राह्मण भजनलाल नवे मुख्यमंत्री

जयपूर – भाजपने मध्य प्रदेश प्रमाणे राजस्थानातही मुख्यमंत्री पदावर अगदी नवा चेहरा आणून धक्का दिला आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज राजस्थानच्या मुख्यमंत्री पदावर भजनलाल शर्मा यांचे नाव घोषित केले. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना दूर करण्यात आले.
मुख्यमंत्री पदावर भजनलाल शर्मा यांचे नाव घोषित करतानाच दोन उपमुख्यमंत्रीही नियुक्त करण्यात आले. दुदु विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रेमचंद बैरवा आणि राजा मानसिंग (द्वितीय) यांची नात राजसमंद व विद्याधर मतदारसंघाची आमदार दिया कुमारी यांना उपमुख्यमंत्री घोषित केले. तर वासुदेव देवनानी हे स्पीकर असणार आहेत.
मुख्यमंत्री भजनलाल शर्मा हे ब्राह्मण आहेत. ते भाजपत सक्रिय होते. गेली तीन वर्षे ते भाजपचे महासचिव होते. यंदा प्रथमच त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली. संगानेरचे विद्यमान आमदार यांना बाजूला करून भाजपच्या या बालेकिल्ल्यात भजनलाल शर्मा यांना उमेदवारी देऊन त्यांना निवडून आणण्यात आले. त्यामुळे पहिल्यांदाच तिकीट मिळाले. पहिल्यांदाच आमदार झाले आणि थेट मुख्यमंत्री पद मिळाले, असा त्यांचा प्रवास आहे.
आपल्याला एक वर्षासाठी मुख्यमंत्री पद द्यावे अशी मागणी वसुंधरा राजे यांनी केल्याचे सांगण्यात येते. मात्र ही मागणी फेटाळण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top