Home / News / राजू, श्याम आणि बाबुराव पुन्हा मोठ्या पडद्यावर दिसणार एकत्र, लवकरच येणार ‘हेरा फेरी 3’

राजू, श्याम आणि बाबुराव पुन्हा मोठ्या पडद्यावर दिसणार एकत्र, लवकरच येणार ‘हेरा फेरी 3’

Hera Pheri 3: हेरा फेरी चित्रपटाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गेली अनेक वर्षांपासून या चित्रपटाचे चाहते ‘हेरा फेरी 3’ ची वाट पाहत आहेत....

By: Team Navakal

Hera Pheri 3: हेरा फेरी चित्रपटाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गेली अनेक वर्षांपासून या चित्रपटाचे चाहते ‘हेरा फेरी 3’ ची वाट पाहत आहेत. मात्र, आता त्यांची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी ‘हेरा फेरी 3’ ची घोषणा करत सर्वांना सरप्राइज दिले आहे.

दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या वाढदिवसानिमित्ताने ‘हेरा फेरी 3’ ची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता चाहत्यांना बाबूराव, राजू आणि श्याम ही लोकप्रिय पात्रं पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहेत. हेरा फेरी 3 मध्ये अक्षय कुमारसोबतच परेश रावल, सुनील शेट्टी हे कलाकार देखील या चित्रपटामध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

प्रियदर्शन यांच्या वाढदिवसानिमित्ताने अक्षयने त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या होत्या. यावर उत्तर देताना प्रियदर्शन यांनी नवीन चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. अक्षयचे आभार मानत त्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, ‘शुभेच्छांसाठी खूप खूप धन्यवाद, अक्षय. मी तुलाही त्या बदल्यात एक भेट देऊ इच्छितो. मी हेरा फेरी 3 करायला तयार आहे. तुम्ही हेरा फेरी करायला तयार आहात का?’

त्यांच्या या पोस्टला उत्तर देताना अक्षयनेही हे त्याच्या आयुष्यातील सर्वोत्तम गिफ्ट असल्याचे म्हणत त्यांचे आभार मानले. हेरा फेरी 3 मध्ये कोणकोणते कलाकार दिसणार हे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. तसेच, चित्रपट कधी रिलीज होणार याचीही घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, आता अशाप्रकारे, चित्रपटाची घोषणा करण्यात आल्याने चाहते आनंदी झाले आहेत.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या