राजेवाडी तलाव आटला! माणदेशावर पाण्याचे संकट

सोलापूर -माणदेशाची तहान भागवण्यासाठी ब्रिटिशांच्या व्हिक्टोरिया राणीने १८७९ मध्ये बांधलेला राजेवाडी तलाव कोरडा पडलेला आहे. या तलावातील पाण्याचा उपयोग जास्तीत जास्त सोलापूर जिल्ह्याला होत आहे. त्यामुळे एकीकडे पाण्याचे दुर्भीक्ष्य, तर दुसरीकडे बारमाही पीक अशी विचित्र स्थिती आहे. सध्या तरी हा तलाव कोरडा पडलेला आहे.
तलावात मृतसंचय पातळीच्या खाली पाणी गेले आहे. त्यामुळे ४ हजार २०८ एकर क्षेत्रावर पाण्याचे संकट उभे ठाकले आहे. आटपाडी तालुक्यातील ८२२ हेक्टर क्षेत्र कायमस्वरूपी सिंचनाखाली घेण्याचे राहिले आहे. राजेवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यास तलावाच्या ३,५५६ फूट लांबीच्या सांडव्यावरून पाणी पडते. यामुळे तलावाखाली लिंगीवरे, दिघंची त्याखाली असणारे बंधारे भरले जातात. आटपाडी तालुक्यातील अनेक नेत्यांच्या उदासीन भूमिकेमुळे सातत्याने २-४ वर्षांनी तालुक्याला दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकावे लागते. हा दुष्काळ संपवण्यासाठी राजेवाडी तलावातील पाणी पूर्ण क्षमतेने मिळणे गरजेचे आहे. दुष्काळ कायमचा हटवण्यासाठी बारमाही माणगंगासारखी योजना राबवावी, त्याचप्रमाणे राजेवाडी उजव्या कालव्याचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करणे गरजेचे आहे, अशी स्थानिकांची मागणी आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top