राज ठाकरे यांची दुसरी सभा पुण्यात

पुणे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे उद्या सभा घेणार आहेत. पुण्यातील सारसबाग परिसरात संध्याकाळी ५ वाजता या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेच्या नियोजनासाठी मनसे कार्यालयात भाजपा आणि मनसेच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. याबाबत बाळा नांदगावकर यांनी सांगितले की, ‘मनसेला मानणारा मोठा मतदार पुणे लोकसभा मतदारसंघात आहे. मनसेचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोहोळ यांच्या प्रचारात उतरले आहेत. ही सभा यशस्वी करण्यासाठी आम्ही सर्व जण काम करत आहोत.’ महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरे यांची ही दुसरी सभा आहे. यापूर्वी राज ठाकरेंनी नारायण राणे यांच्या प्रचारासाठी सभा घेतली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top