रामदास आठवले यांनी घेतली धम्मगुरु दलाई लामा यांची भेट

मुंबई
जागतिक बौध्द धम्मगुरु दलाई लामा यांची धर्मशाळा(हिमाचल प्रदेश) येथे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज सदिच्छा भेट घेतली. 16 डिसेंबर रोजी मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्स मैदान येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर धम्मदिक्षा समारोह समितीतर्फे आयोजित जागतिक धम्म परिषदेत प्रमुख अतिथी म्हणून पुज्य धम्मगुरु दलाई लामा यांनी उपस्थित राहण्याचे निमंत्रण रामदास आठवले यांनी दिले.
यावेळी महाराष्ट्रातील आंबेडकरी , बौध्द जनतेशी मला संवाद साधायचा आहे. त्यामुळे मी नक्की मुंबईत आयोजित धम्मपरिषदेत उपस्थित राहणार असल्याचे सांगत पुज्य धम्मगुरु दलाई लामा यांनी रामदास आठवले यांनी दिलेले धम्मपरिषदेचे निमंत्रण स्विकारले.यावेळी रामदास आठवले यांच्या सोबत डॉ.बाबासाहेब आंबेडकर धम्मदिक्षा समारोह समितीचे सरचिटणीस अविनाश कांबळे,खजिनदार पद्मश्री कल्पना सरोज हे उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top