राममंदिराचा निकाल देणाऱ्या पाच न्यायाधीशांना निमंत्रण

अयोध्या – राममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी मंदिर ट्रस्टच्या वतीने देशभरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे.या निमंत्रितांमध्ये रामजन्मभूमी-बाबरी मशिद खटल्यात अंतिम निकाल देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयातील खंडपीठाच्या पाच न्यायाधीशांचाही समावेश आहे,असे वृत्त आहे.
राम मंदिर ट्रस्टने प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी तयार केलेली निमंत्रितांची यादी समोर आली आहे. 55 पानांची ही यादी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय बृहद्पीठाने राम जन्मभूमी-बाबरी मशिद वादावर अंतिम निकाल दिला होता. न्या. रंजन गोगोई, न्या.शरद अरविंद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या.अशोक भूषण, न्या. एस. अब्दुल नजीर अशी या न्यायाधिशांची नावे आहेत.
९ नोव्हेंबर २०१९ रोजी राम जन्मभूमी – बाबरी मशिद वादावर या न्यायाधीशांनी अंतिम निकाल देताना वादग्रस्त भूखंडावरील २.७७ एकर जमीन हे रामाचे जन्मस्थान असल्याचे मान्य करून ती जागा राम मंदिर ट्रस्टला देण्याचे आदेश दिले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top