राममंदिरातील गाभार्‍याच्या स्वच्छतेसाठी चांदीचा झाडू

अयोध्या – अयोध्येत श्रीरामाच्या मूर्ती प्रतिष्ठापनेनंतर दर्शनाला येणारे भाविक आपापल्या परीने दर्शनाबरोबर अमूल्य असे दान अर्पण करत आहेत.’अखिल भारतीय मांग समाज’च्या श्री राम भक्तांनी तर या मंदिरातील खास गाभार्‍याच्या स्वच्छतेसाठी चक्क चांदीचा झाडू बनवला आहे.हा चांदीचा झाडू नुकताच राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडे सुपूर्द करण्यात आला. गर्भगृहाच्या स्वच्छतेसाठी या झाडूचा वापर केला जाणार आहे.या चांदीच्या झाडूचे वजन १.७५१ किलो आहे. खिल भारतीय मांग समाजाचे मधुकर राव देवहरे यांनी सांगितले की, हा झाडू बनविण्यासाठी ११ दिवस लागले.झाडूच्या माथ्यावर देवी लक्ष्मी विराजमान आहे आणि भोवती सुंदर नक्षीकाम आहे, या झाडूला १०८ चांदीच्या काड्या आहेत.त्यांचे वजन १.७५१ किलो आहे.झाडू गर्भगृहात ठेवावा आणि स्वच्छतेसाठी वापरावा अशी विनंती आम्ही राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top