रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा मुहूर्त जाहीर

अयोध्या

अयोध्यातील भव्य राम मंदिरातील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा मुहूर्त जाहीर झाला. येत्या २२ जानेवारीला दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी सोहळ्याला सुरुवात होईल व २३ जानेवारी रोजी रात्री एक वाजेपर्यंत सोहळ्याचा मुहूर्त असेल. २२ जानेवारी रोजी रामलल्लाच्या पावन मूर्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, ४ हजार संत आणि १४० पंथाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. वाराणसीचे वेदिक पुरोहित लक्ष्मीकांत दीक्षित हे प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे पौरोहित्य करतील. २२ जानेवारी हा दिवस रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी शुभ मुहूर्त आहे. याशिवाय या सोहळ्यात विविध भागातून २५०० जणांना विशेष निमंत्रण देण्यात आले आहे. यामध्ये शहीद जवानांचे कुटुंबीय, दिवंगत कारसेवकांचा समावेश असेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top