रामलल्लाला ५६ पदार्थांचा भोग

अयोध्या :

अयोध्येत नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी रामलल्लाला ५६ पदार्थांचा भोग चढवला. अनेक प्रकारच्या मिष्टान्नांचा समावेश असलेला हा प्रसाद लखनौमधील एका प्रसिद्ध दुकानातून मागवला होता. रामलल्लाचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी श्रीरामाला भोग चढवला.

लखनौचे मिठाई व्यवसायिक तथा रामभक्त सृजल गुप्ता यांनी सांगितले की, जेव्हा प्रभू रामलल्ला यांना मुख्य मंदिरातून तात्पुरते दुसऱ्या मंदिरात नेण्यात आले, तेव्हापासून आम्ही नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी ५६ पदार्थांचा भोग चढवतो. आता पुन्हा २२ जानेवारीला रामलल्लाच्या भव्य अभिषेक सोहळ्यानिमित्त ५६ पदार्थांचा भोग चढवला जाणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top