रामायणातील राम-सीता- लक्ष्मण सोहळ्यासाठी अयोध्यानगरीत दाखल

अयोध्या

अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी रामायण मालिकेतील राम, सीता आणि लक्ष्मणाची भूमिका साकारणारे कलाकार अरुण गोविल, दीपिका चिखलिया आणि सुनील लहरी अयोध्यानगरीत पोहोचले. अयोध्येत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागताचा व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल झाला.

रामायण ही मालिका गाजल्यानंतर अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया लोकांमध्ये जात तेव्हा त्यांना लोक राम-सीताच मानून त्यांच्या पाया पडायचे. त्यांच्यासमोर नतमस्तक व्हायचे. रामायण मालिकेत सीता मातेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका चिखलिया लाल रंगाची साडी नेसून अयोध्येत आल्या. रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल आणि लक्ष्मण झालेले सुनील लहरी यांनी सारखाच वेश केला होता. त्यांचे स्वागत करण्यासाठी अयोध्येतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. काहींनी हातात श्री रामांचे झेंडे देखील घेतले होते. काही दिवसांपूर्वी सुनील लहरी यांनी सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण न मिळाल्याने त्यांंनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, आता राम आणि सीतामाते सोबतच लक्षम्ण देखील अयोध्येत पोहोचले आहेत. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top