राम मंदिराच्या दानपेटीमध्ये २ दिवसांत ३.१७ कोटी जमा

अयोध्या- रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर अयोध्येत भाविकांचा महासागर उसळला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी जवळपास अडीच लाखांहून अधिक भाविकांनी प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले.या भाविकांनी रामाच्या चरणी भरभरून दान देखील दिले आहे.या दोन दिवसांत राम मंदिराच्या दानपेटीत तब्बल ३.१७ कोटी रुपये जमा झाले आहेत.

पहिल्या दोन दिवसांत भाविकांनी दान पेटीत तसेच ऑनलाइन देणगी दिली आहे.यासाठी भाविकांना मोठी कसरत देखील करावी लागली.प्रचंड गर्दी असूनही दानपेटीपर्यंत पोहचण्यासाठी
भाविकांनी संयम दाखवत तासनतास रांगेत उभे राहून दान अर्पण केले.अयोध्येत भव्य दिव्य राम मंदिर उभारण्यात यावे,अशी रामभक्तांची इच्छा होती. यासाठी त्यांना अनेक दशके वाट पाहावी लागली. अजूनही अनेक भाविक रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येत दाखल होत अजून यानिमित्ताने तिजोरीत मोठी भर पडण्याची शक्यता आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top