राम मंदिराच्या भव्य सिंहद्वाराचे काम पूर्ण

अयोध्या

अयोध्येत श्रीराम जन्मभूमीवर उभ्या राहत असलेल्या मंदिराच्या भव्य सिंहद्वाराचे काम पूर्ण झाले आहे. तर नृत्य मंडप, फरशीवरील नक्षीकाम अंतिम टप्प्यात आहे. तसेच मंदिराच्या पहिल्या मजल्याचे काम आता ६० टक्के पूर्ण झाले आहे. यासाठी ३ हजार मजूर रात्रंदिवस काम करत आहेत. डिसेंबरपर्यंत या मजल्याचे बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती राम मंदिर निर्माण ट्रस्टने दिली आहे. तीन मजली राम मंदिराचा तळमजला तयार आहे. या तळमजल्यावर १७० खांब आहेत. या मजल्याचे सर्व १४ दरवाजेही तयार आहेत. आता उर्वरित काम सुरु आहे. खांबांवर देवांच्या मूर्ती कोरल्या जात आहेत. नोव्हेंबरपर्यंत मजल्याचे बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. मंदिराच्या दरवाजासाठी लागणारे लाकूड महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातून आणले आहे. छत टाकण्याचे कामही लवकरच सुरू होणार आहे. २२ जानेवारीला मंदिरात रामलल्ला यांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यावेळी सुमारे १० हजार पाहुणे आणि दोन लाखांहून अधिक रामभक्त अयोध्येत येणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top