राम मंदिरातील पुजारी भरतीसाठी गुणवत्तेनुसार २२५ जणांच्या मुलाखती

अयोध्या- उत्तर प्रदेशातील अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिरात पुजाऱ्यांच्या भरतीसाठी गुणवत्ता यादी तयार करण्यात आली असून, त्यासाठी मुलाखतीही सुरू झाल्या आहेत.

पुजार्याच्या पदासाठी एकूण तीन हजार जणांनी ऑनलाइन अर्ज केले होते. यातील गुणवत्ता यादीच्या आधारे २२५ जणांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले आहे. मुलाखतीत निवड झालेल्यांना ६ महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर गरजेनुसार त्यांची नियुक्ती केली जाईल.श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र द्वारे चालविण्यात येणाऱ्या प्रशिक्षण योजनेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर होती.आता शनिवारपासून दोन दिवसीय मुलाखतीची प्रक्रिया सुरू झाली आहे.तीर्थक्षेत्र रामकोट येथील निवासी कार्यालयात झालेल्या या मुलाखतीसाठी पहिल्या टप्प्यात निवडण्यात आलेल्या २२५ उमेदवारांना मुलाखतीसाठी एक दिवस अगोदर त्यांच्या मोबाइलवर मेसेज पाठवण्यात आला होता.या मुलाखतीची वेळ शनिवारी दुपारी एक वाजता निश्चित करण्यात आली होती.उमेदवारांना प्रथम भरण्यासाठी एक फॉर्म दिला.उमेदवारांनी फॉर्म भरून सादर केल्यानंतर त्यांची यादी तयार करण्यात आली. त्यानंतर मुलाखतीला सुरुवात झाली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top