राम मंदिर उदघाटना आधी अमेरिकेत हिंदूंची भव्य रॅली

वॉशिंग्टन –
अयोध्येत २२ जानेवारी रोजी राम मंदिराचे उदघाटन होणार आहे. त्यापूर्वी अमेरिकेतील हिंदू भाविकांनी एकत्र येऊन उदघाटनाचा जल्लोष साजरा केला. अअमेरिकेमधील वॉशिंग्टन डीसी येथील मेरीलँडच्या श्री भक्त आंजनेय मंदिराजवळ विश्व हिंदू परिषदेच्या वतीने चारचाकी आणि मोटारसायकल रॅली काढण्यात आली. यावेळी अनेक हिंदू भाविक या रॅलीत सहभागी झालेले होते

आंजनेय मंदिराजवळ असलेल्या अयोध्या मार्गावरून वाहन आणि मोटारसायकल मिरवणूक काढण्यात आली. मोठ्या प्रमाणावर अमेरिकन हिंदू त्यात सहभागी झाले होते. अमेरिकेच्या इतर राज्यांतूनही काही हिंदू भाविक या रॅलीत सहभागी होण्यासाठी आले असल्याचे सांगण्यात येते.

या कार्यक्रमाच्या आयोजकांपैकी एक असलेले विश्व हिंदू परिषदेच्या वॉशिंग्टन डीसीचे अध्यक्ष महेंद्र सापा यांनी सांगितले की, २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा होईल. त्या निमित्ताने आम्ही वॉशिंग्टन येथे राम मंदिर उदघाटनाचा सोहळा साजरा केला. तसेच २० जानेवारी २०२४ रोजी आम्ही वॉशिंग्टन डीसी येथे ऐतिहासिक अशा सोहळ्याचे आयोजन केले आहे. त्यामध्ये १००० हिंदू कुटुंब सहभागी होतील, अशी आमची अपेक्षा आहे. यावेळी रामलीला, राम कथा, श्री राम आरती आणि भजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top