राम मंदिर बांधणार्‍या कंपनीचा शेअर २७० टक्क्यांनी वाढला

नवी दिल्ली- देशातील सर्वात मोठी बांधकाम कंपनी एल अँड टी अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम करत आहे. ही देशातील सर्वात मोठी बांधकाम कंपनी असून या कंपनीने यापूर्वी अनेक मोठ्या पायाभूत सुविधा आणि इमारती बांधल्या आहेत. राम मंदिराचे निर्माणकार्य ५ ऑगस्ट २०२० रोजी सुरू झाले होते. तेव्हापासून एल अँड टी कंपनीच्या शेअरने भागधारकांना तब्बल २७० टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे.

५ ऑगस्ट २०२० रोजी कंपनीच्या शेअरची किंमत ९३४ रुपये होती.४ जानेवारी २०२४ रोजी शेअरची किंमत ३४५२ रुपयांवर पोहोचली होती. २२ जानेवारी रोजी राम मंदिरात रामलल्लाचा अभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे.यावेळी प्रभू रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. यापुढेही या कंपनीच्या शेअरचा भाव वाढण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top