Home / News / रायगड रोपवेवर अडकलेल्यांच्या सुटकेचे विशेष प्रात्यक्षिक यशस्वी

रायगड रोपवेवर अडकलेल्यांच्या सुटकेचे विशेष प्रात्यक्षिक यशस्वी

महाड – छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने पावन झालेल्या किल्ले रायगडावरील रोप-वेमध्ये अडकलेल्यांची सुखरूप सुटका करण्यात आली. परंतु रोपवेतील नागरिकांची सुटका...

By: E-Paper Navakal

महाड – छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने पावन झालेल्या किल्ले रायगडावरील रोप-वेमध्ये अडकलेल्यांची सुखरूप सुटका करण्यात आली. परंतु रोपवेतील नागरिकांची सुटका करण्याचे हे प्रात्यक्षिक असल्याचे कळल्यावर सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास टाकला.रायगडावर जाणारे पर्यटक रोप-वेमध्ये अडकल्यास त्यांची कशी सुटका करण्यात येईल, यासाठी रोप-वे प्रशासनाने हे प्रात्यक्षिक केले. यावेळी रोप-वे प्रशासनाच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या अत्याधुनिक सुरक्षासाधनांची चाचणीही घेण्यात आली. या प्रात्याक्षिकात भारतीय वायुदल, विशेष दल, एनडीआरएफ, पोलीस, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांच्यातील परस्पर समन्यवाचाही सराव करण्यात आला. जवळ जवळ चार तास हे प्रात्यक्षिक सुरू होते. एनडीआरएफ च्या विशेष प्रशिक्षित पथकानेही यात भाग घेतला. आणीबाणीचा प्रसंग उद्भवल्यास सर्व यंत्रणा किती वेळेत घटनास्थळी पोहोचून मदत कार्य सुरु करु शकतात याचीही तपासणी यावेळी करण्यात आली.

Web Title:
संबंधित बातम्या