रायबरेलीत दिनेश सिंह यांना उमेदवारी

नवी दिल्ली – भाजपाने रायबरेली मतदारसंघातून दिनेश प्रताप सिंह यांना उमेदवारी जाहीर केली. दिनेश प्रताप हे मूळचे रायबरेलीचेच आहेत. २०१० पासून ते सतत उत्तर प्रदेश विधान परिषदेतून निवडून गेले. सध्या ते योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात मंत्री आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या विरोधात ते २०१९ ची निवडणूक लढले होते. तेव्हा तोपर्यंत कुठल्याही भाजपाच्या उमेदवाराला मिळाली नाहीत, इतकी मते त्यांना मिळाली होती. २०१९ मध्ये उत्तर प्रदेशात काँग्रेसला फक्त रायबरेली मतदारसंघात विजय मिळाला होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top