रावणाच्या मंदिरातही आता श्रीरामाचा जयजयकार होणार

अयोध्या – अयोध्येत २२ जानेवारीला प्रभू रामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या दिवशी नोएडामधील बिसरख भागातील रावणाच्या मंदिरातदेखील श्रीरामाचा जयजयकार होणार आहे. स्थानिक लोककथेनुसार, बिसरख हे रावणाचे जन्मस्थान आहे. रावणाच्या या मंदिरात शिव, पार्वती आणि कुबेराच्या मूर्तीही ठेवण्यात आल्या आहेत.

रावण मंदिराचे पुजारी महंत रामदास यांनी सांगितले की, अभिषेक दिनी मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. त्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. १४ जानेवारीपासून मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये अखंड रामायणासह विविध कार्यक्रमांचा समावेश आहे. त्यानंतर भंडारादेखील आयोजित करण्यात येणार आहे. कार्यक्रम संपल्यानंतर मिठाईचे वाटप करण्यात येईल. ह्या प्राचीन रावण मंदिरात राम आणि रावण एकत्र बसणार आहेत. मंदिरात सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांच्या मूर्तींनादेखील अभिषेक केला जाणार आहे. अभिषेकासाठी रावण मंदिराची विशेष सजावट करण्यात आली आहे. सजावटीसाठी कोलकाता येथून १० क्विंटलहून अधिक फुले आणली आहेत. यासोबतच मंदिरावर रंगीबेरंगी झालरही लावण्यात येत आहेत. या मंदिरात कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ग्रामस्थांकडून विशेष सहकार्य केले जात आहे. हे मंदिर रात्रीही बंद नसते. येथे येणारे भाविक भगवान शिव, कुबेर आणि अगदी रावणाची पूजा केली जाते. मंदिरात शंकराची ८ भुजा असलेली मूर्ती आहे. रावण या शिवमूर्तीची पूजा करत असे असे मानले जाते. पण आता या मंदिरात आता रामही बसणार आहे.रावणाची पूजा करणारे हे देशातील एकमेव मंदिर असल्याचे ग्रामस्थ सांगतात आणि रावणाचे नाव येताच मनात रामाची सुंदर प्रतिमा तयार होते. राम आणि रावण दोघेही एकमेकांना पूरक आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top