राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे चौथऱ्यावरून शनिदर्शन

शनिशिंगणापूर –

महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनी शिंगणापूरला जाऊन शनीदेवाचे दर्शन घेतले. शनी देवाच्या शिळेवर तेल अर्पण करून पूजा केली. यावेळी राज्यपालही उपस्थित होते.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या दीक्षांत कार्यक्रमासाठी राष्ट्रपती राज्यात आल्या होत्या. सकाळी हा कार्यक्रम आटोपल्यानंतर दिल्लीला परतण्यापूर्वी त्या शनी शिंगणापूरला गेल्या. राष्ट्रपती प्रथमच शिंगणापूरला येत असल्याने प्रशासनाच्या वतीने मोठी तयारी केली होती. सकाळपासूनच शनीमंदिर परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. केंद्र व राज्याची गुप्तचर यंत्रणा, सुरक्षा विभाग, जिल्हा प्रशासनाचे सर्व विभाग तसेच शनैश्‍वर देवस्थानच्या वतीने नियोजन केले होते. राष्ट्रपतींचे श्री शनैश्वर मंदिरात आगमन झाल्यावर त्यांनी उदासी महाराज मठात त्यांनी अभिषेक करत चौथ-यावर जाऊन शनीदेवाच्या मूर्तीवर तेल अर्पण करत दर्शन घेतले. शनीदेवाचे दर्शन झाल्यानंतर प्रसादालयात राष्ट्रपतींनी प्रसादाचे सेवनही केले. तसेच पुढील नियोजीत दौर्‍यासाठी दिल्लीला रवाना झाल्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top