राष्ट्रवादीच्या संघर्ष यात्रेचा १२ डिसेंबरला नागपुरात समारोप

नागपूर

नागपुरात झिरोमाईल येथे १२ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीर सेभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार १२ डिसेंबरला नागपुरात येणार आहेत. या सभेत राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनी सुरु केलेल्या संघर्ष यात्रेचा समारोप होणार आहे. राष्ट्रवादीच्या या जाहीर सभेत महाविकास आघाडी देखील सहभागी होणार आहे. माजी मुख्यमंत्री उध्वव ठाकरे, काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग या सभेला उपस्थित राहणार आहेत. संघर्ष यात्रेच्या समारोप कार्यक्रमाला विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, पुथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व मित्र पक्षाचे खासदार, आमदार व इतर नेत्यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण देण्यात येणार आहे, अशी माहिती माजी मंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

२४ ऑक्‍टोबरपासून पुणे येथून सुरू झालेली ही संघर्ष यात्रा तब्‍बल ८०० किलोमीटरचा प्रवास करून १२ डिसेंबरला नागपूर येथे पो‍होचणार आहे. सध्या ही यात्रा विदर्भात आहे. शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन, धान, संत्रा, तूर व इतर शेतमालास योग्य भाव द्या, पिक विमा योजनेचा फायदा शेतकऱ्यांना देण्यात यावा, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्या, राज्यातील विविध खात्यातील रिक्त पदे त्वरित भरा, महिला सुरक्षेसाठी शक्ती कायदा लागू करा, कंत्राटी नोकरभरती रद्द करा, ड्रग्जच्या विळख्यात अडकत चाललेल्या तरूणाईला वाचवा, जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, शाळा दत्तक योजना रद्द करा, समुह शाळा योजना रद्द करा यासह इतर मागण्यांसाठी रोहित पवार यांनी ही युवा संघर्ष यात्रा काढली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top