राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटलांना डेंग्यूची लागण

मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना डेंग्यूची लागण झाली आहे. जयंत पाटील यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर याबाबतची माहिती दिली आहे. यासोबतच त्यांनी मेडिकल रिपोर्ट सुद्धा पोस्ट केला आहे. सध्या जयंत पाटील यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील डेंग्यूची लागण झाली होती.

‘कालपासून मला ताप आलेला असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने मी आज डेंग्यूची तपासणी केली. थोड्या वेळापूर्वीच त्याचे रिपोर्ट आले असून मला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. काही दिवस विश्रांती घेऊन मी शक्य तितक्या लवकर माझ्या दैनंदिन व पक्ष कामकाजाला सुरवात करेन’, असे त्यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर म्हटले आहे. आता जयंत पाटिल यांची प्रकृती आता स्थिर आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष कार्यालयाने दिली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top