राष्ट्राध्यक्षपदासाठी ट्रम्प आघाडीवर ४३ टक्के जनतेचा कौल

वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षातर्फे पुन्हा राष्ट्राध्यक्षपदासाठी दावा करणारे डोनाल्ड ट्रम्प यांनी सध्याचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना मागे टाकले आहे. अमेरिकेत ४३ टक्के जनतेने जो बिडेन यांची राष्ट्राध्यक्षपदासाठी पसंती दर्शवली आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या सर्वेक्षणात हे स्पष्ट झाले. या सर्वेक्षणानुसार, जो बायडन अप्रूव्हल रेटिंगमध्ये सर्वात खालच्या पातळीवर आहेत. यामुळे बायडन यांची उमेदवारी धोक्यात असल्याचे स्पष्ट होत आहेत, तर दुसरीकडे डेमोक्रॅटिक पक्षातही बायडन यांना दुसऱ्या टर्ममध्ये उमेदवारी देण्यावरून मतभेद होत आहेत. मात्र, बायडन यांनी पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीतही आपली उमेदवारी निश्चित असल्याचे सांगितले आहे. बायडन यांना निवडणूक लढण्यासाठी वयोमर्यादा देखील आड येत आहे. याशिवाय बायडन यांचा मुलगा हंटर बायडन यांच्यावरही कर प्रकरणांमध्ये आरोप करण्यात आले आहेत, यामुळेही बायडन यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात अनेक खटले सुरू आहेत, पण तरीही त्यांची लोकप्रियता वाढत आहे. डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या इतर उमेदवारांपेक्षा वरचढ आहेत. कदाचित बायडन यांचीही हे लक्षात आले असेल, त्यामुळेच शुक्रवारी कॅलिफोर्नियामध्ये एका निधी उभारणीच्या कार्यक्रमात बायडेन यांनी ट्रम्प यांच्यावर थेट हल्ला चढवला, असे बोलले जाते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top