Home / News / राहुल गांधींची पुन्हा भारत जोडो यात्रा

राहुल गांधींची पुन्हा भारत जोडो यात्रा

नवी दिल्ली – राहुल गांधी लवकरच भारत जोडो यात्रा काढणार आहेत . त्यांच्या भारत जोडो यात्रेचा तिसरा टप्पा लवकरच सुरू...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

नवी दिल्ली – राहुल गांधी लवकरच भारत जोडो यात्रा काढणार आहेत . त्यांच्या भारत जोडो यात्रेचा तिसरा टप्पा लवकरच सुरू होणार असल्याचे त्यांनी स्वतःच सांगितले. ४ राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर त्यांची ही तिसरी भारत जोडो यात्रा खूपच महत्त्वाची समजली जात आहे.राहुल गांधींच्या पहिल्या दोन टप्प्यांना देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळेच भारत जोडो यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याचे नियोजन सुरु झाले आहे. त्यासाठी यात्रा मार्गाचा नकाशा तयार करण्यात येत आहे. त्यांच्या यात्रा मार्गामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीचा पूर्ण विचार केला जाईल. सर्व तयारी झाल्यानंतर यात्रेची औपचारिक घोषणा केली जाणार असल्याचे समजते .भारत जोडो यात्रेबद्दल बोलताना त्यांनी सांगितले भारत जोडो यात्रे दरम्यान, ज्या शहरात मुक्काम झाला तिथे सहप्रवासी आणि तरुण मार्शल आर्ट विद्यार्थ्यांना एकत्र आणून सराव करायचो. तसेच या यात्रेच्या निमित्ताने जनतेशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली, असेही त्यांनी सांगितले.

Web Title:
संबंधित बातम्या