राहुल गांधींविरोधातील याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

नवी दिल्ली – काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सदस्यता पुन्हा बहाल करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने आज फेटाळली.अशी निरर्थक याचिका दाखल केल्याबद्दल न्यायालयाने याचिकाकर्त्याला एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
मोदी या आडनावावरून राहुल गांधी यांनी केलेल्या एका टिप्पणीवरून त्यांच्यावर मानहानीचा खटला करण्यात आला होता. या खटल्यात गुजरातमधील न्यायालयाने राहुल यांना दोषी ठरवून दोन वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली होती. शिक्षा झाल्याने राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. या निर्णयाला राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.त्या आव्हान याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने लोकसभा सचिवालयाचा निर्णय रद्द ठरविला होता. त्यामुळे सचिवालयाने राहुल गांधी यांचे सदस्यत्व पुन्हा बहाल केले होते. सचिवालयाच्या या निर्णयाला अॅड. अशोक पाण्डेय यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.ती याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top