राहुल गांधी यांचा प्रकृतीमुळे वायनाड दौराही रद्द झाला

तिरुअनंतपुरम

काँग्रेस नेते राहुल गांधी केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. वायनाडमध्ये २६ एप्रिलला मतदान होणार आहे. यासाठी आज वायनाडमध्ये राहुल गांधी यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र प्रकृतीच्या कारणास्ताव राहुल गांधी आज वायनाड येथील प्रचार सभेत सहभागी होऊ शकले नाहीत. उद्या त्यांच्या अमरावतीत दोन सभा नियोजित असून या सभांना ते येतात का याकडे सर्वांचे लक्ष आहे .

राहुल गांधी यांना रविवारी प्रचारा दरम्यान अन्नातून विषबाधा झाली होती. त्यामुळे राहुल गांधी यांची प्रकृती बिघडली होती. त्यांना आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. याच कारणास्तव आज वायनाड येथील प्रचारसभेत राहुल गांधी यांनी सहभाग घेतला नाही. काल देखील केरळमध्ये राहुल गांधी यांच्या आयोजित सभा रद्द करण्यात आल्या. राहुल गांधी यांच्या अनुपस्थितीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि प्रियांका गांधी यांनी आज वायनाड येथे प्रचारसभा घेतल्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top