Home / News / राहुल गांधी ३ दिवसीय अमेरिका दौऱ्यावर

राहुल गांधी ३ दिवसीय अमेरिका दौऱ्यावर

नवी दिल्ली- लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी तीन दिवसीय अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांचा हा दौरा ८ सप्टेंबर ते १०...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

नवी दिल्ली- लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी तीन दिवसीय अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांचा हा दौरा ८ सप्टेंबर ते १० सप्टेंबर पर्यंत असणार आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच अमेरिकेला जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते डलास आणि वॉशिंग्टनला भेट देतील. इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोदा यांनी ही माहिती दिली. सॅम पित्रोदा म्हणाले की, राहुल गांधी ८ सप्टेंबर रोजी अमेरिकेतील डलास शहराला भेट देणार आहेत. तर वॉशिंग्टनमध्ये ९ आणि १० सप्टेंबर रोजी असणार आहेत. यादरम्यान राहुल गांधी भारतीय वंशाचे लोक, विद्यार्थी, व्यापारी, तज्ञ आणि स्थानिक नेत्यांशी संवाद साधतील.

Web Title:
संबंधित बातम्या