रीलसाठी दाभोसा धबधब्यात उडी! २६ तासांनंतर मृतदेह सापडला

नाशिक

नाशिक जवळील जव्हार गावातील दाभोसा धबधब्यात स्टंटबाजी व रील बनवण्यासाठी १२० फुटांवरून उडी मारणे तरुणाच्या जीवावर बेतले. माझ शेख असे या तरुणाचे नाव आहे. तब्बल २६ तासांनंतर काल दुपारी २ वाजताच्या सुमारास या तरुणाचा मृतदेह हाती लागला. या घटनेत आणखी एक जण जखमी झाला असून हे दोघेही मुंबई आणि मीरा-भाईंदर येथील रहिवासी आहेत.

दाभोसा धबधब्यावर तीन तरुण मित्र पर्यटनासाठी आले होते. त्यांना येथील पाण्याच्या व डोहाच्या खोलीचा अंदाज नसतानाही त्यांनी उंचावरून उडी मारली. यावेळी त्यांचा मित्र पर्यटक डोहाजवळून त्यांचा व्हिडीओ काढत होता. धबधब्यात पाणी कमी असल्याने माझ हा वर आलाच नाही, तर त्याचा मित्र जोएफ शेख हा जखमी अवस्थेत कसाबसा वर आला. त्याच्या कमरेला, पायाला, मानेवर जबर मार बसला. या घटनेची माहिती मिळताच हिरडपाडा येथील ग्रामस्थ, नगरपरिषद, पोलीस कर्मचाऱ्यांनी माझचा शोध सुरू केला. यावेळी तब्बल २६ तासांच्या शोधकार्यानंतर काल मृतदेह हाती लागला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top