रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक

मुंबई

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर ठाणे-कल्याण पाचव्या-सहाव्या मार्गिकेवर मध्यरात्री १ ते पहाटे ४ वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. या कालावधीत मुंबईकडे जाणाऱ्या मेल/एक्स्प्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील, तर मुंबईहून जाणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाडया कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील.

हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते चुनाभट्टी /वांद्रे अप-डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे सीएसएमटी आणि वडाळा रोड येथून डाऊन मार्गावर वाशी, बेलापूर, पनवेल, वांद्रेसाठी सुटणाऱ्या गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. अप मार्गावरील गाड्याही या कालावधीत रद्द आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुझ ते गोरेगाव अप-डाऊन जलद मार्गावर सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत ब्लॉक असेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top