‘रॉकी’ फेम अभिनेता कार्ल वेदर्स यांचे निधन

वॉशिंग्टन :

प्रसिद्ध अमेरिकन अभिनेते कार्ल वेदर्स यांचे काल निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. आपल्या अभिनयाने नेहमीच लोकांच्या हृदयाला स्पर्श करणाऱ्या कार्ल वेदर्स यांनी ‘रॉकी’ चित्रपटाच्या फ्रँचायझीमध्ये बॉक्सर अपोलो क्रीडची भूमिका साकारली होती. त्यांच्या निधनाने चाहत्यांना धक्का बसला आहे.वेदर्स यांच्या कुटुंबाने त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट केलेले नाही. मात्र, कार्ल वेदर्स यांचा झोपेतच मृत्यू झाला, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.
मोठा पडदा असो वा छोटा पडदा कार्ल वेदर्स यांनी नेहमीच उत्कृष्ट काम केले आहे. त्यांनी चित्रपट आणि टीव्ही विश्वात ७५हून अधिक शो केले होते. त्यांनी १९७० मध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. ‘रॉकी’व्यतिरिक्त, कार्ल वेदर्सने ‘स्टार वॉर्स’, स्पिन ऑफ सिरीज ‘द मँडलोरियन’ आणि १९८७ मधील सायन्स फिक्शन हॉरर फिल्म ‘प्रिडेटर’ मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. ‘रॉकी’ चित्रपटामुळे वेदर्स यांना खूप प्रसिद्धी मिळाली. १९८८ मध्ये आलेल्या ‘ॲक्शन जॅक्सन’ चित्रपटात ते मुख्य भूमिकेत दिसले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top