रोहित पवारांची आज पुन्हा ईडी चौकशी

मुंबई

बारामती अ‍ॅग्रो कारखाना कथित गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची उद्या ईडी चौकशी होणार आहे. यापूर्वी २४ जानेवारी रोजी बारामती अग्रो त्यांची पहिली ईडी चौकशी झाली होती. उद्या दुसऱ्यांदा रोहित पवारांची ईडी चौकशी होणार आहे. बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी रोहित पवारांना ईडीने १९ जानेवारी रोजी समन्स बजावले होते. २४ जानेवारी रोजी तब्बल १२ तास रोहित पवारांची ईडी चौकशी झाली होती. उद्या दुसऱ्यांदा रोहित पवारांची ईडी चौकशी होणार आहे. चौकशीपूर्वी रोहित पवारांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. तर खासदार सुप्रिया सुळे रोहित पवारांना ईडी कार्यालयापर्यंत सोडण्यासाठी गेल्या होत्या. ईडी अधिकाऱ्यांनी यावेळी रोहित पवारांकडून काही कागदपत्रे मागितली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top