रोहित पवारांना ईडीचे समन्स

पुणे- बारामती ॲग्रो कंपनी प्रकरणी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना ईडीकडून बुधावारी २४ जानेवारीला ईडी कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहेत.
ईडीने 15 दिवसांपूर्वीच रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोशी संबंधित काही ठिकाणी छापेमारी केली होती. या छापेमारीत बारामती ॲग्रोच्या पुणे आणि बारामती येथील कार्यालयांचादेखील समावेश होता. ईडीकडून कागदपत्रांची छाननी करण्यात आली होती. ईडीच्या या छापेमारीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. संबंधित कारवाई झाली तेव्हा रोहित पवार हे विदेशात गेले होते. छापेमारीच्या दुसऱ्या दिवशी ते मुंबईत परतले होते.त्यानंतर आता रोहित पवार यांना ईडीचे समन्स बजावण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top