लंडनचा हायस्पीड रेल्वे प्रकल्प रद्द

लंडन –

ब्रिटनमध्ये आगामी निवडणुकांआधी पंतप्रधान ऋषी सुनक यांनी लंडनला मध्य आणि उत्तरेकडील भागांना जोडणारी हाय स्पीड रेल्वे लाइन योजना रद्द केली. वारेमाप खर्च करून सुरू असलेला हा प्रकल्प रद्द करावा अशी विरोधकांची तसेच रेल्वे कर्मचाऱ्यांचीही मागणी होती.

पक्षाच्या वार्षिक परिषदेतील भाषणात सुनाक यांनी ही घोषणा केली. सुनक यांनी यासंदर्भातील माहिती देताना सांगितले की अनेक दिवसांपासून ही योजना वादात अडकली होती. या योजनेचा दुसरा टप्पा मी थांबवत आहे, जेणेकरून या योजनेऐवजी अन्य ठिकाणी ३६ अब्ज पाऊंडची गुंतवणूक करता येईल.

सुनक यांच्या या निर्णयावर टीका होत आहे. जीएमबी ट्रेड युनियनचे धोरणप्रमुख लॉरेन्स टर्नर म्हणाले की या निर्णयामुळे अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड पडणार आहे. नव्या हायस्पीड रेल्वे योजनेशिवाय आपण अर्थव्यवस्थेचा समतोल राखू शकणार नाही. भविष्यात येणाऱ्या सरकारने हा निर्णय बदलायला हवा.

ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी या रेल्वे प्रकल्पाला मंजुरी दिली होती. हा प्रकल्प मध्य आणि उत्तर लंडनला जोडणार होता. या योजनेवर १२९ अब्ज डॉलर खर्च होणार होता. मात्र कोरोनानंतर ब्रिटनची अर्थव्यवस्था डबघाईला आली आणि या प्रकल्पालाही त्याची झळ पोहोचली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top