लंडनमध्ये इस्रायल आणि पॅलेस्टाईन समर्थकांमध्ये वाद

लंडन

इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या चार दिवसांपासून युद्ध सुरू आहे. युद्धानंतर सर्वत्र सातत्याने निदर्शने होत आहेत. कोणी इस्रायलला पाठिंबा देत आहे तर कोणी पॅलेस्टाईनचे समर्थन करत आहे. लंडनमध्येही युध्दानंतर इस्रायल आणि पॅलेस्टाईन समर्थक असे दोन गट तयार झाले. ह्या गटांत काल रात्री वाद निर्माण झाला. ही घटना लंडनच्या हाय स्ट्रीट केन्सिंग्टन ट्यूब स्टेशनवर घडली.

पॅलेस्टाईन आणि इस्रायलच्या समर्थनार्थ लंडनमध्ये विविध ठिकाणी निदर्शने होत आहेत. तर काही ठिकाणी ही आंदोलने हिंसक वळण घेत आहेत. सोमवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास लंडनमधील इस्रायली दूतावासाबाहेर मोठी गर्दी वाढू लागली. हजारो निदर्शक पॅलेस्टिनी झेंडे घेऊन इस्रायलच्या विरोधात धार्मिक घोषणा देत होते . काही पॅलेस्टाईन सर्मथकांनी दूतावासाबाहेर फटाक्यांची आतिशबाजी सुरु केली. यामुळे पॅलेस्टाईन समर्थक आणि इस्रायल समर्थक यांच्या वाद निर्माण झाला. त्यानंतर ह्या दोन्ही गटांत हाणामारी झाली. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक करत त्यांची चौकशी सुरु केली आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी हमासचे समर्थन करणाऱ्या लोकांचा दहशतवादी असा उल्लेख केला आहे. या या भीषण हल्ल्याला हमासचे समर्थन करणारेच जबाबदार आहेत, असे सुनक यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर म्हटले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top