लंडनमध्ये मोदी…मोदी! भाजपाचा अनोखा प्रचार

लंडन
लंडनमधील भाजपा समर्थकांनी आज भाजपाच्या प्रचारासाठी लंडनमध्ये रन फॉर मोदी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी काढण्या आलेल्या एका फेरीत लंडनमधील भाजपा समर्थकांनी भाग घेतला. भाजपाचे झेंडे घेत रस्त्यावरुन चालत त्यांनी प्रचार केला आणि मोदी मोदी अशी घोषणाबाजी केली
लंडनमध्ये आज सकाळी निघालेली ही फेरी वेस्टमिनिस्टर पायर इथून निघून लंडनच्या मध्यवर्ती भागातून जात टॉवर ब्रिज वर समाप्त झाली. नरेंद्र मोदी यांना भारतात सुरु असलेल्या निवडणूकांमध्ये पाठिंबा देण्यासाठी या फेरीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भाजपाचे आनंद आर्या यांनी दिली. त्यानी दावा केला आहे की, यावेळी लंडनमधील भाजपाचे ५०० समर्थक उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top