लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पुण्यात फटाक्यांमुळे १६ ठिकाणी आग

पुणे

पुणे शहरात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाक्यांमुळे तब्बल १६ ठिकाणी आग लागली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही. या घटनांची माहिती मिळताच अग्निशामन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनांमध्ये बरेच नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरात विविध ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. काही नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे या आगीच्या घटना घडल्या. अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात रात्री साडेसात वाजल्यानंतर रात्री दहा वाजेपर्यंत आगीच्या १६ घटनांची नोंद झाली. चौकीजवळ घरामध्ये आग लागली. ८.२४ वाजता कोंढवा बुद्रुक पोलिस चौकीसमोर कचऱ्याला आग लागली. ८.५० वाजता नाना पेठ, चाचा हलवाईजवळ इमारतीत दहाव्या मजल्यावर घरात आग लागली. ८.५२ वाजता घोरपडे पेठ, मारुती मंदिराजवळ झाडाला आग लागली. ८.५७ वाजता कोंढवा, शिवनेरीनगर येथे इमारतीत छतावर आग लागली. ८.५८ वाजता वारजे, आदित्य गार्डन, फ्लोरा सोसायटीत घरामध्ये आग लागली. ९ वाजता शुक्रवार पेठेत पोलिस चौकीसमोर वाड्यामध्ये आग लागली तर वाघोली-बायफ रस्ता, ब्ल्यू स्काय सोसायटीतील सदनिकेत सुध्दा आग लागली. ९.१३ वाजता केशवनगर मुंढवा रस्ता, गुडविल सोसायटीतील सदनिकेत आग लागली. ९.२७ वाजता आंबेगाव पठार येथे भंगार दुकानात आग लागली. ९.३१ वाजता शुक्रवार पेठेत पोलिस चौकीसमोरील तिसऱ्या मजल्यावर आग लागली. ९.३२ वाजता गुरुवार पेठेतील कृष्णाहट्टी चौकातील दुकानात आग लागली. ९.५० वाजता हडपसर, रासकर चौकात एका घरामध्ये आग लागली. ९.५१ वाजता पिसोळी, खडी मशिन चौकाजवळील अदविका सोसायटीत घराच्या गॅलरीत आग लागली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top