लग्नात शीख वधूनेलहंगा घालण्यावर बंदी- श्री हजूर साहिबची नियमावली

            नांदेड -
शीख धार्मिक परंपरा आणि मर्यांदांबद्दल नांदेडच्या श्री हजूर साहिबने नवीन नियमावली प्रसिद्ध केली आहे. लग्नसोहळ्यात वधू फेरे (लावो) घेत असताना लहंगा घालू शकत नाही. लग्नात वधूने कमीज, सलवार आणि डोक्यावर चुन्नी घालावी. या नियमाचे पालन न केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असेदेखील या नियमावलीतून सांगण्यात आले आहे. 
गुरुद्वारात येताना वधू महागडा फॅशनेबल लहंगा आणि घागरा घालून येतात. या पोशाखात वधूला चालणे, उठणे, बसणे आणि गुरु महाराजासमोर नतमस्तक होणे अवघड होते. विवाहच्या नियंत्रण पत्रिकेत मुलाच्या नावापढे सिंग आणि वधूच्या नावपुढे कौर लिहिले जात नाही. हे चुकीचे आहे. पत्रिकेच्या बाहेर आणि आत सिंग आणि कौर अनिवार्य असेल.यापुर्वी लग्नसोहळ्यात श्रीगुरुगंथ साहिब घेऊन जाण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. काही लोक श्रीगुरुग्रंथ साहिब समुद्र किनाऱ्यावर घेऊन जातात आणि लग्नाचे फेरे घेतात. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top