लहान मुलांवरील हल्ल्यानंतर आयर्लंडची राजधानी पेटली

डबलिन – आयर्लंडची राजधानी डबलिनमध्ये काल एका शाळेबाहेर चाकू हल्ला झाला होता. यामध्ये ३ लहान मुलांसोबत ५ जण जखमी झाले होते. यानंतर शहरात सगळीकडे दंगल सुरू झाली. यामुळे सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली. यासोबतच नागरिकांना अत्यंत आवश्यक असल्याशिवाय बाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला.
चाकूहल्ला प्रकरणी पोलिसांनी एका ४० वर्षांच्या व्यक्तीला अटक केली आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे. ही व्यक्ती एक आयरिश नागरिक असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, शहरातील स्थलांतर-विरोधी संघटनांनी रस्त्यावर उतरुन निदर्शने सुरू केली. पोलिसांनी त्यांना आवर घालण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांच्यात आणि पोलिसांमध्ये वाद झाला, आणि त्यानंतर दंगल सुरू झाली. या दंगलीमध्ये बऱ्याच ठिकाणी जाळपोळ करण्यात आली. एक डबल डेकर बस पेटवल्याची घटना घडली. शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या हॉलिडे इन हॉटेल आणि मॅकडॉनल्डच्या काचा देखील फोडण्यात आल्या. जवळच्या एका दुकानात लूटमार झाली. यासोबतच एक पोलीस व्हॅन देखील जाळण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top