लाचखोरी प्रकरणात अदानी समूहाविरुद्ध अमेरिकेत चौकशी

नवी दिल्ली- अदानी समूह आणि त्याच्या संस्थापकाची लाचखोरीप्रकरणी अमेरिका चौकशी करत आहे. ब्लूमबर्गच्या अहवालातून ही बाब समोर आली आहे. अमेरिकेने अदानी समूहाचे संस्थापक गौतम अदानी यांच्या वर्तनावर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांच्या तपासाची व्याप्ती वाढवली आहे. अदानी कंपनी लाचखोरीत सहभागी होती का, याची चौकशी सुरू आहे. हे संपूर्ण प्रकरण एका ऊर्जाप्रकल्पाशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे.
अदानी समूहाच्या कोणत्याही युनिटने किंवा कंपनीशी संबंधित असलेल्या लोकांनी ज्यामध्ये स्वतः गौतम अदानी यांचा समावेश आहे, हा ऊर्जा प्रकल्प घेण्यासाठी भारतातील अधिकाऱ्यांना पैसे दिले होते का, याचा तपास अमेरिकन अधिकारी करत आहेत. ऊर्जा कंपनी अझर पॉवर ग्लोबलदेखील तपासात सामील आहे, असे या प्रकरणाशी संबंधित असलेल्या लोकांनी सांगितले.न्यूयॉर्कचे वकील आणि वॉशिंग्टनमधील न्याय विभागाच्या फसवणूक युनिटद्वारे तपास केला जात आहे.
अदानी समूहाने ईमेल केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “आम्हाला आमच्या अध्यक्षांविरोधातील कोणत्याही चौकशीची माहिती नाही. एक व्यावसायिक समूह म्हणून आम्ही शासनाच्या सर्वोच्च मानकांचे पालन करतो.आम्ही भारतातील भ्रष्टाचारविरोधात काम करण्यासाठी कटिबद्ध आहोत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top