Home / News / ‘लाडकी बहीण’ जाहिरातींवर 200 कोटींचा प्रचंड खर्च

‘लाडकी बहीण’ जाहिरातींवर 200 कोटींचा प्रचंड खर्च

मुंबई – महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची जाहिरात सर्वत्र झळकत आहे. राज्यातल्या मराठी वृत्त वाहिन्या, एफएम रेडिओ, टीव्हीवरच्या जाहिराती...

By: netadmin
Social + WhatsApp CTA

मुंबई – महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची जाहिरात सर्वत्र झळकत आहे. राज्यातल्या मराठी वृत्त वाहिन्या, एफएम रेडिओ, टीव्हीवरच्या जाहिराती सर्वत्र ही जाहिरात प्रत्येक दहा मिनिटांनी कुठे ना कुठे दिसतेच. तर या योजनेच्या जाहिरातीवर राज्य सरकारने तब्बल 200 कोटी रुपये खर्च केल्याचे माहिती अधिकारातून मागवलेल्या माहितीतून उघड झाले आहे. विशेष म्हणजे या खर्चामध्ये चालू आठवड्याचा खर्च धरण्यात आलेला नाही.
आपल्या हातातल्या मोबाईलच्या व्हॉट्सअ‍ॅपमध्ये, सोशल मीडियाच्या माध्यमातून, एसटी बसेसवर, रेल्वे स्थानकावर, विमानतळावर अगदी सगळीकडेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे हसतमुख चेहरे आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची माहिती सतत दिसत राहण्याची सोय केली आहे. या जाहिराती वेगवेगळ्या योजनांचा प्रचार आणि प्रसारासाठी केल्या जात आहेत असे सरकारचे म्हणणे आहे.
‘मुख्यमंत्री माझी- लाडकी बहीण योजना.’ या योजनेसाठी 46 हजार कोटी रुपयांचा निधी यासाठी सरकारने मंजूर केला तर या योजनेच्या जाहिरातींसाठी राज्यात तब्बल 200 कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती उघड झाली आहे.

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या