लाडक्या वाघ्या बैलाचा अचानक मृत्यू! आज कुटुंबीयांकडून दशक्रिया विधी

सिन्नर- शहरातील खळवाडी येथील गोळेसर कुटुंबातील सुनील रामनाथ गोळेसर व अमोल गोळेसर तसेच ज्वालामाता ग्रुपचा लाडका बैल वाघ्याचा ६ जानेवारीला आकस्मिक मृत्यू झाला. त्यानंतर आता गोळेसर कुटुंब उद्या मकर संक्रातीच्या दिवशी १५ जानेवारी रोजी विधिवत पूजा करून त्याचा दशक्रिया विधी करणार आहे.तसेच ज्वालामाता बैलगाडा संघटनेचे सर्व सदस्य यावेळी मुंडन करणार आहेत.
वाघ्याच्या मृत्यूने घरातील एखादा कर्ता व्यक्ती दगावल्याचे दुःख गोळेसर कुटुंब व ज्वाला माता बैलगाडा संघटना कुटुंबीयांना झाले आहे. बैलाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी गोळेसर कुटुंबीयांनी त्याच्यावर एखाद्या मृत माणसासारखे अंत्यसंस्कार केले.आता दशक्रिया विधी होणार आहे.
वाघ्याने २४ ते २५ हून अधिक बैलगाडा शर्यती जिंकून तो अपराजित योद्धा ठरला.बैलगाडा शर्यतीत अगदी कमी वेळात धावण्याचे वाघ्याने कमी वयात अनेक विक्रम केले आहेत.तालुक्यात होणाऱ्या प्रत्येक बैलगाडा शर्यतीत फायनल सम्राट म्हणून वाघ्याने अनेक बक्षिसे मिळविली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top