लायबेरियन मालवाहू जहाजांवर हुथी बंडखोरांनी क्षेपणास्त्रे डागली

वॉशिंग्टन-

येमेनच्या हुथी बंडखोरांनी लाल समुद्रातील जहाजांवर पुन्हा हल्ला चढवला. या बंडखोरांनी लाल समुद्राच्या कॉरिडॉरमधील तीन लायबेरियन जहाजांना धडक दिली व दोन जहाजांवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली. ही जहाजे लाल समुद्राच्या दक्षिणेकडील भागातून उत्तरेकडे जात होती, मात्र बंडखोरांनी या जहाजांना दमदाटी करत वळसा घालून पुन्हा दक्षिणेकडे जाण्यास भाग पाडले, असा दावा अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने आज आपल्या एक्स पोस्टमधून केला.

येमेनमधील हुथी बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या भागातून दोन मालवाहू जहाजांवर अचानक हल्ला चढवला. लाल समुद्रातील बाब अल-मंदेब सामुद्रधुनीजवळ या मालवाहू जहाजांवर क्षेपणास्त्रे डागण्यात आली. या हल्ल्यात जहाजांना आग लागल्याचे खलाशांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या संरक्षण दलाच्या एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती देताना सांगितले की, एका जहाजाचे नाव एमएससी पॅलेटियम-३ असे आहे. या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top