लासलगावात कांदा पुन्हा गडगडला

नाशिक
केंद्राने कांदा निर्यातबंदी केल्याने बाजारात कांद्याची आवक वाढली असल्याने लासलगाव बाजारात कांद्याचे भाव रोज कोसळत आहेत. आज कांद्याचा भाव ३२५ रूपयांनी कोसळला . यामुळे जेरीस आलेल्या शेतकऱ्यांनी मागणी केली की कांद्याला किमान ३००० भाव मिळेल अशी सरकारने व्यवस्था करावी . आम्हाला २००/३०० रूपये अनुदान देऊ नका . त्यापेक्षा ३ हजार वर भाव स्थिर ठेवा . बाजारात लाल कांदा आला आहे . हा कांदा फार काळ टिकत नसल्याने त्याची विक्री लवकर करावी लागते . यामुळे अधिकच अडचण येत आहे .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top