लिबियामध्ये प्रवासी बोट बुडाली ६१ निर्वासितांचा मृत्यू ! २५ वाचले

त्रिपोली

लिबियाच्या समुद्रकिनारी प्रवाशांनी भरलेली बोट काल बुडून ६१ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचादेखील समावेश आहे. लिबियातील आंतरराष्ट्रीय प्रवासी संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, ही बोट लिबियाच्या जवारा शहरातून निघाली होती. त्यामध्ये एकूण ८६ प्रवासी होते. यापैकी २५ जणांना वाचवण्यात यश आले आहे. वाचलेल्या प्रवाशांची लिबियातील एका डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. तिथे त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्यांची प्रकृती व्यवस्थित आहे.

काही महिन्यांपूर्वी लिबियात बोट दुर्घटनेत घटनेत जून महिन्यात ७९ प्रवासी बुडाले होते, तर अनेक बेपत्ता झाले होते. फेब्रुवारीमध्ये झालेल्या वादळात त्यांची बोट इटलीच्या कॅलेब्रियन किनार्‍याजवळील खडकांवर आदळली होती, त्यात ९६ लोकांचा मृत्यू झाला होता. जहाजावरील बहुतेक लोक इजिप्त, सीरिया आणि पाकिस्तानचे होते. लिबियात २०११ पासून अंतर्गत यादवी सुरू असून अनेक देश समुद्राच्या मार्गाने युरोपला जाण्यासाठी बोटींतून प्रवास करतात. किनारपट्टी भागात मानव तस्करीचे मोठे जाळे असून नप्रामुख्याने लष्करी गटांद्वारे ते चालवले जाते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top