लेखिकेच्या अब्रुनुकसानीबद्दल डोनाल्ड ट्रम्पना ६९२ कोटींचा दंड

मॅनहटन –

अब्रुनुकसानीच्या प्रकरणात मॅनहॅटन कोर्टाने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात निकाल देत त्यांना जबर दंड फटकारला आहे. कोर्टाच्या आदेशानुसार ट्रम्प यांना लेखिका ई. जीन कॅरोल यांना अब्रुनुकसानीबद्दल ८३.३ मिलियन डॉलर (६९२ कोटी) रुपये द्यावे लागणार आहेत.

स्तंभलेखिका कॅरोल यांनी ट्रम्प यांच्यावर लैगिक अत्याचाराचा आरोप केला होता. त्यानंतर ट्रम्प यांनी भरपूर बदनामी केली. या विरोधात कॅरोल यांनी १० दशलक्ष डॉलरचा अब्रुनुकसानीचा दावा केला होता. मात्र, कोर्टाने त्यापेक्षा कितीतरी पट अधिक ८३.३ दशलक्ष डॉलरची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयावर प्रतिक्रिया देताना हा हास्यास्पद निर्णय असल्याचे सांगत याविरोधात आपण वरच्या कोर्टात अपील करणार असल्याचे म्हटले आहे. न्यायव्यवस्था हाताबाहेर गेली असून तिचा राजकीय शस्त्र म्हणून वापर केला जातोय, असेही ते म्हणाले.

कोर्टाने ट्रम्प यांना ६५ दशलक्ष डॉलरचा दंड ठोठावला आहे. त्यात ७.३ दशलक्ष डॉलर प्रतिपूरक दंड, ११ दशलक्ष डॉलर रेप्युटेशनल रिपेअरसाठी असे एकूण ८३.३ दशलक्ष डॉलरचा अकूण दंड आहे. ७७ वर्षीय ट्रम्प हे
ट्रम्प हे याच वर्षी होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उमेदवार आहेत. त्यामुळे त्यांना हा झटका असल्याचे समजले जात आहे.

या खटल्याच्या सुनावणी ट्रम्प उपस्थित होते. परंतु सुनावणी सुरू असताना अचानक ट्रम्प उठून बाहेर गेल्याने न्यायाधीश लुईस ए. कपलान यांनी सुनावणीच्यामध्ये अडथळा आणल्याचा शेरा मारला. त्यांनी म्हटले की, सुनावणीदरम्यान ट्रम्प मध्येच कोर्टातून उठून बाहेर निघून गेले, याचा उल्लेख रेकॉर्डमध्ये केला जाईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top