लैगिंक छळाच्या आरोपामुळे डब्लूडब्लूएफचे प्रमुख पायउतार

वॉशिंग्टन –
डब्लूडब्लूडब्लूएफ या गाजलेल्या करमणूक वाहिनीचे प्रमुख आणि गेल्या अनेक वर्षांपासून वाहिनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले विन्से मॅकमोहन यांनी आपल्या पदाचा आणि व्यवस्थापन कंपनीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. एका माजी महिला सहकाऱ्याने केलेल्या लैगिंक छळाच्या आरोपामुळे त्यांनी हा राजीनामा दिला आहे.
कंपनीचे अध्यक्ष निक खान यांनी एका ईमेलद्वारे ही माहिती सर्व कर्मचाऱ्यांना दिली आहे. जॅनेल ग्रँट या एका माजी महिला सहकाऱ्याने त्यांच्यावर भावनिक आणि लैगिंक अत्याचार केल्याचा त्याचप्रमाणे वारंवार बलात्कार केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मॅकमोहन यांनी राजीनामा दिला आहे. कंपनीच्या भल्यासाठी आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मॅक आणि त्यांच्या पत्नीने १९८० साली या वाहिनीची सुरुवात केली होती. काही वर्षातच ही वाहिनी आंतरराष्ट्रीय स्तरावरही लोकप्रिय झाली. कुस्तीचे विविध मनोरंजन करणारे सामने या वाहिनीवरून प्रक्षेपित होतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top