लोकसभा निवडणुकीमुळे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा लाबंणीवर

मुंबई

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने काही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ अंतर्गत ६, ७ आणि १३ मे रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. यासंदर्भात मुंबई विद्यापीठ प्रशासनाने माहिती दिली आहे. विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, केवळ परीक्षांच्या तारखांमध्येच बदल करण्यात आला आहे. परीक्षेची वेळ आणि केंद्र यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. हे वेळापत्रक मुंबई विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या सर्व कला, वाणिज्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान महाविद्यालयांना लागू असणार आहे. मुंबई विद्यापीठाने परीक्षांच्या सुधारित तारखांची माहिती एका परिपत्रकाद्वारे जाहीर केली आहे. या परिपत्रकानुसार, ६ मे रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा आता १८ मे रोजी होणार आहे. तर ७ मे रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा २५ मे रोजी होणार आहेत. तसेच १३ मे रोजी होणाऱ्या परीक्षा ८ जूनला होणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top