लोकसभेसाठी मनसे समन्वयक जाहीर पुण्याची जबाबदारी अमित ठाकरेंवर

मुंबई- मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर मनसेत आता हालचालींना वेग आला आहे. आता मनसेकडून लोकसभा निवडणुकीसाठी मतदारसंघनिहाय समन्वयक समिती जाहीर करण्यात आली आहे. यात राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे पुण्याचे, तर ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांच्यावर शिर्डी, अहमदनगर, जालना, सांगली आणि अन्य ठिकाणची जबाबदारी दिली आहे.

अभिजित पानसे यांना ठाणे, तर अविनाश जाधव यांना पालघरचे समन्वयक म्हणून जाहीर करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे आमदार राजू पाटील आणि अविनाश जाधव-भिवंडी आणि कल्याण, अमित ठाकरे,राजेंद्र (बाबू) वागस्कर, किशोर शिंदे, बाळा शेडगे – पुणे,अभिजित पानसे, किशोर शिंदे, गणेश सातपुते- नाशिक,अभिजित पानसे यांना जळगावचीदेखील जबाबदारी देण्यात आली आहे. ते जळगाव जिल्ह्याचे एकमेव समन्वयक असणार आहेत. राजेंद्र (बाबू) वागस्कर आणि अजय शिंदे- शिरुर, नितीन सरदेसाई, रणजित शिरोळे आणि अमेय खोपकर – मावळ आणि संदीप देशपांडे यांना रायगडची जबाबदारी दिली आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्गसाठी शिरीष सावंत, नितीन सरदेसाई आणि अविनाश जाधव यांना समन्वयक केले आहे.

मुंबईमध्ये दक्षिण मध्य मुंबई- नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, उत्तर मध्य- मुंबई संजय चित्रे, राजा चौगुले,उत्तर पश्चिम मुंबई- योगेश परुळेकर, शालिनी ठाकरे, संदीप दळवी, उत्तर मुंबई- अविनाश अभ्यंकर, नयन कदम, गजानन राणे,उत्तर पूर्व मुंबई- शिरीष सावंत, मनोज चव्हाण,रिटा गुप्ता यांचा समावेश आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top