लोकसभेसाठी रावेर मतदार संघ चर्चेत! रक्षा खडसेंचा पत्ता कट होण्याचीच चिन्हे

जळगाव – सद्यस्थितीत देशात सर्वत्र अयोध्या व राम मंदिरमय वातावरण असतानाच लोक सभा निवडणुकीचेही वारे वाहू लागले आहेत.त्यातून विद्यमान खासदारांना आपापले स्थान टिकविणे मोठे आव्हान ठरणारं आहे.विशेष करून जिल्ह्यातील दोन्ही म्हणजे जळगाव व रावेरच्या भाजप खासदारांना पुन्हा संधी मिळेल काय हा महत्वाचा प्रश्न साऱ्यांनाच भेडसावू लागला आहे. उल्लेखनीय की,रावेरच्या भाजप खासदार रक्षा खडसे यांनीही खडसे आडनाव असल्याने माझी अडचण होत असल्याची खंत व्यक्त केली आहे.दुसरीकडे खुद्द एकनाथ खडसे यांनीही तसेच वक्तव्य केल्याने रावेरकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे भाजप सोडून राष्ट्रवादीत गेल्यापासून रावेरच्या भाजप खासदार रक्षा खडसे यांच्याबद्दल संशयकल्लोळ वाढीस लागला आहे.जिल्ह्यात गिरिश महाजन व एकनाथ खडसे यांच्यातील वितुष्ट सर्वश्रुत आहेच,त्यात भाजप खासदार रक्षा या एकनाथांच्या स्नुषा असल्याने त्यांच्याबद्दल भाजपात आकस असणे स्वाभाविक म्हटले जात आहे.एकाच घरात सासरेबुवा राष्ट्रवादीचे तर सुनबाई भाजपच्या हे गणित कुणालाही पटणारे नाही.गिरीश महाजन यांना तर अजिबात रूचणारे नाही.परिणामी रक्षा यांनाही पुन्हा रावेरच्या उमेदवारीची शाश्वती नसावी म्हणूनच त्यांनीही खंत व्यक्त केली असल्याची चर्चा आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top