Home / News / लोकायुक्तांनी सिध्दरामय्यांची चौकशी सुरू केली

लोकायुक्तांनी सिध्दरामय्यांची चौकशी सुरू केली

बंगळुरू – म्हैसूरच्या लोकायुक्तांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांचा सहभाग असलेल्या कथित म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी (मुडा) जमीन घोटाळ्याप्रकरणी आजपासून चौकशी सुरू केली. याप्रकरणी लोकायुक्तांनी २७ सप्टेंबर रोजी सिध्दरामय्या, त्यांची पत्नी, मेहुणा आणि इतरांविरुध्द एफआयआर दाखल केला .

याच प्रकरणात अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) काल सर्व आरोपींविरुध्द मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल केला.मुडा प्राधिकरणाने म्हैसूर शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेले १४ भूखंड सिध्दरामय्यांच्या पत्नी बी एन पार्वती यांना बेकायदेशीरपणे हस्तांतरीत केल्या आरोप आहे. दुसरीकडे पार्वती यांनी मुडा आयुक्तांना पत्र लिहून वादग्रस्त १४ भूखंड परत करण्याची तयारी दर्शविली आहे.काल रात्री उशिरा मुख्यमंत्री कार्यालयाने हे पत्र सोशल मीडियावर शेअर केले आहे.