लोखंडवाला भागातील इमारतीत आग

मुंबई

मुंबईतील अंधेरी लोखंडवाला भागात असलेल्या आकाशदीप इमारतीत आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी २ ते ३ तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविले. अचानक लागलेल्या आगीमुळे इमारतीमधील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेत जिवीतीहानी झाली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीमधील नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top